Shivjayanti celebration on 18th Feb 2021


के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

के. के. वाघ युनिव्हर्सल स्कूल सरस्वती नगर येथे हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेच्या प्राचार्या सौ अमृतराव यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांची पारंपारिक वेशभूषा धारण केली होती व त्यांच्या जीवनावर आधारित विविध कविता, पोवाडे, गाणे, नृत्य,घोषवाक्य व त्यांची सुवचने सादर केली. तसेच माननीय प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे शिस्तप्रियता, स्वाभिमान, न्यायप्रियता, प्रामाणिकपणा, आदर्श मार्गदर्शक व राज्यकर्ता, धाडसीपणा, कर्तव्यदक्षता या प्रेरणादायी विचारांचे अनुकरण करण्यास सांगितले त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Map

Contact Details